दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती येथील भारतीय महाविद्यालयात होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक विदयार्थ्यांनी सोमवारी ( दि. २९ नोव्हेंबर ) सकाळी १० वाजता महाविद्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आपल्या सर्व कागदपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन वाणिज्य विभागातील प्रा. नितीन तट्टे यांच्यासह प्राध्यापकांनी केले होते. या रोजगार मेळाव्यात संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील मागील तीन वर्षात विविध शाखांमधून पदवी, पदवीत्तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग दिसून आला.
