स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात भाज्यांची आवक कमी होऊन भाव कडाडल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे भाजीपाला बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होऊन आज कोथिंबीर जुडीला शनिवारच्या तुलनेत उच्चांकी 30 रुपये भाव मिळाला.तसेच कांदा ,बटाट्याची, आवक वाढुन दरात ३००ते ५०० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने, ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे.याच कारणाने भाजीपाल्याचे भाव कडले असून सामान्य लोकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागनार आहेत।वाढल्याने कांद्याचे भाव घसरले दिसुन आले.कोथँबिरीच्या 38960 व मेथीच्या 21540 जुड्यांची मोठ्या प्रमाणात आवक भाजीपाला बाजारात झाल्याची पाहायला मिळाली.

आज भाजीपाला बाजारात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आवक झाल्याने ४ रुपये ७ मेथीला व १० रुपये ३० रुपये कोथंबीर जुडीला असा उच्चांकी भाव मागील शनिवारच्या तुलनेत पाहायला मिळाला .मात्र हिरवी मिरची व फ्लॉवरची आवक सर्वात जास्त झालेली आज भाजीपाला बाजारात झालेली दिसुन आली.

खेड तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीकाचे उत्पादन घेतले जाते. चाकण मार्केटयार्डमध्ये देखील कांद्याचा मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने मोठी उलाढाल पाहायला मिळते.त्यामुळे चाकण कृषी उत्पन्न बाजारपेठ देखील देशात कांद्यासाठी प्रसिध्द आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम संपल्यानंतर कांदा पिकाची लागवड केली.परंतु बदलते हवामान,अवकाळी पाऊस यामुळे अजुन नवीन कांदा बाजारात कृषी उत्पन्न बाजारात कांदा येण्यासाठी अजुन बराच कालावधी लागणार आहे.त्यामुळे कांदा पिकाची आवक कमी जास्त प्रमाणात होत असलेली पाहायला मिळत आहे.
