Post Views: 385
चांदूर रेल्वे प्रतिनिधी :- सुभाष कोटेचा सह धीरज पंवार
चांदूर रेल्वे येथील वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयात ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे,प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या चांदूर रेल्वे तालुकाध्यक्षा बेबीनंदा लांडगे उपस्थित होते.यावेळी प्रा.रविंद मेंढे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी बेबीनंदा लांडगे यांनी
भारतीय संविधान उद्दशिकेचे वाचन केले.
तर प्रा.रवींद्र मेंढे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, पार्श्वभूमी, घटनाक्रम यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला वंचित महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष हिरू मेंढे, सचिव अनिता धवणे, मनोहर टिक्कस,राहुल खोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.