अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे जूनी नोंद शोधण्याकरिता वनोजा बाग येथील रहिवासी सीआयएसएफ जवान गेला असता नोंद शोधण्यास तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याची घटना घडली असून उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्या आदेश पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली. सीआयएसएफ जवानाला कर्मचाऱ्यांनी हीन वागणूक देत उडवा उडवीचे उत्तरे दिली. याची माहिती तहसील कार्यालयात उपस्थीत पत्रकार महेंद्र भगत यांना मिळताच सदर प्रकरण महेंद्र भगत यांनी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या दालनात नेले असता तहसीलदार अभिजीत जगताप व महेंद्र भगत यांच्या मध्यस्थीने सदर जवानाला जूनी नोंद शोधण्यास मदत झाली. तहसिलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत तहसील कार्यालयातील उपस्थीत सर्वच कर्मचाऱ्यांना सदर जवानाची जात प्रमाणपत्र पडताळणीची जूनी नोंद असल्याचे दस्त ऐवज शोधण्याचे आदेश देत सर्वच कर्मचाऱ्यांना मार्गी लावले.
सदर जवान हा दिनांक २२ नोव्हेंबर पासुन तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांचे पत्र घेवून आला असता कर्मचाऱ्यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली. सीआयएसएफ जवानाला सदर नोंदीचे दस्त ऐवज हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) उपमहानिरीक्षक राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद यांच्या आदेशान्वये जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी दस्तऐवज सादर करावयाचे असल्याने गेल्या तीन दिवसापासून कर्मचाऱ्यांची जूनी नोंद शोधण्यास विनंती करीत होता परंतू कर्मचारी यांनी जवानाला हीन पणाची वागणूक दिल्या गेल्याची माहिती पत्रकार महेंद्र भगत यांना मिळताच त्यांनी सदर प्रकरण तहसीलदार यांच्या दालनात नेल्याने तहसिलदार अभिजीत जगताप यांनी तात्काळ जवानाला दिनांक २५ नोव्हेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणीचे जूनी नोंद असल्याचे दस्त ऐवज प्राप्त करून दिले यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार अभिजीत जगताप, पत्रकार महेंद्र भगत, पत्रकार प्रवीण बोके, पत्रकार सुनिल माकोडे व सामाजिक कार्यकर्ते पंकज हिरुळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया —-
“मी सी आय एस एफ जवान असुन ६ दिवसांच्या सुट्टीवर आलो असता मला माझ्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जात प्रमाण पत्र तयार केल्याचा जुना रेकॉर्ड दाखल करायचा असल्याने मी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी दर्यापूर पत्र घेऊन गेलो असता तेथील कर्मचारी यांनी मला हीन वागणूक दिली याची माहिती तेथे उपस्थित महेन्द्र भगत यांना कळताच हस्तक्षेप करून तहसिलदार यांना सांगुन मला माझा जुना रेकॉर्ड शोधण्यास सहकार्य केले.”
चक्रधर मुरलीधर चव्हाण सी आय एस एफ जवान (हैद्राबाद)