भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोशन कट्यारमल यांनी केले आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
माझा प्रभाग माझी जबाबदारी या उपक्रमातुन दर्यापूर मधील प्रभाग क्रमांक – ६ मध्ये भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोशन कट्यारमल यांनी गांधीनगर बनोसा दर्यापूर परिसरात आयोजित ई श्रम कार्ड शिबिराचा सुमारे ८०० नागरिकांनी लाभ घेतला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून माझा प्रभाग माझी जबाबदारी या उपक्रमातुन शक्य ते प्रयत्न केले जात असल्याची माहिती रोशन कट्यारमल यांनी यावेळी दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश विल्हेकर, निखिल बीजवे, दर्शन सोनाळेकर, दीपक मलीये, सागर मलीये, शुभम चौखंडे ऋषी चिकठे, निलेश विल्हेकर, दर्शन सोनाळेकर, दीपक मलीये, सागर मलीये, ऋषी चिकठे, प्रणव साखरे, मृणाल इंगळे आदींनी सहकार्य केले.