72 उद्देश पत्रिका लिहून घडीपत्रिका शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणार
प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम :-येथून जवळच असलेल्या काजळांबा गावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी काल संविधान दिनानिमित्त” माझे संविधान माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे 72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 72 विद्यार्थ्यांनी लेखन करून त्याची घडी पत्रिका शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे सांगितले.

सकाळी विद्यार्थ्यांनी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन वेगवेगळे घोषवाक्य असलेली फलक घेऊन संपूर्ण गावातून संविधान ग्रंथाचे प्रभात फेरी काढून जनजागृती केली.
त्यानंतर शाळेमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संविधान निर्माते भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला.
