प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम- ज्येष्ठ विधिज्ञांनी भारतीय राज्यघटनेप्रती आणि कायद्याप्रती आपली बांधिलकी जोपासून वर्षातून काहीतरी प्रकरणांमध्ये कोणतेही शुल्क न करता गोरगरिबांची बाजू मांडावी. असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांनी व्यक्त केले.
आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन आणि विधी दिनाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते, यावेळी न्या. श्रीमती सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न्यायिक अधिकारी सर्वश्री एस.एम.मेनजोगे, एस पी.शिंदे,आर. पी. कुलकर्णी, विधीज्ञ संघाचे सचिव ऍड एन टी जुमडे यांची उपस्थिती होती.
