प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान समितीसमोर अखेरचे भाषण केले होते. त्यात ते म्हणाले होते की, संविधान कितीही चांगले असले, पण ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रामाणिक असतील तरच ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही असे मनोगत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीयांनी भारताच्या संविधानाला अंगिकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करुन घेतले. या घटनेला जवळपास 71 वर्षाचा कालावधी झालेला आहे. भारतीय जनतेला स्वत:च्या व राष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टिने मोठा कालखंड मिळालेला आहे.
या देशात अनेक धर्म आहे, हजारो जाती आहे, दर 14 – 14 मैलावर भाषा बदलणार्या हजारो भाषा आहेत मात्र या देशाचा धर्म समता, स्वातंत्र, बंधुत्व न्यायावर आधारीत संविधान हा देशाचा आत्मा आहे असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विलास राऊत यांनी दिनांक 26-11-2021 रोजी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कारंजा (लाड) येथे आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाला प्रगत मित्र मंडळाचे विजय गागरे, सामाजिक कार्यकर्ते चांदभाई मुन्नीवाले, बाबाराव डोंगरदिवे, विनायक वरघट, दादाराव डोंगरदिवे, विष्णू ढोके, मोसिनोद्दीनभाई, संदेश तायडे यंाच्या प्रमुख उपस्थितीत सपन्न झालेल्या या नेत्रदिपक संविधान दिनाच्या कार्यक्रमास सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुध्दवंदना घेवून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व संविधानानुसार आचरण करुन त्याचा प्रचार व प्रसार करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
