उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचर पोलीस ठाण्यासह खेड तालुक्यातील विकास कामांचा आढावा

पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाणे आणि खेड राजगुरूनगर येथील प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे आदी विकास कामांचा आढावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला.


आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाणे तसेच खेड तालुक्यातील राजगुरूनगर प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, निमगाव खंडोबा मंदिर येथे रज्जू हवाई मार्ग (रोप वे) तसेच रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. खेड प्रशासकीय इमारतीसाठीच्या जागेबाबतची तांत्रिक अडचण त्वरित सोडवण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, इमारती दर्शनीय दृष्टीकोनातून सुंदर आणि नागरिकांना आपल्या कामांच्यादृष्टीने आश्वासक वाटली पाहिजे. सर्व इमारतींमध्ये भरपूर हवा खेळती राहण्यासह नैसर्गिक प्रकाशव्यवस्था असावी. संपूर्ण इमारतीची विजेची गरज सौरऊर्जेद्वारे भागली पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करावे. उद्वाहकांची व्यवस्था असली तरी प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांची जास्त ये- जा असणारी प्रांत, तहसील, दुय्यय निबंधक, भूमी अभिलेख आदी कार्यालये पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर ठेवावीत जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांना मजले चढण्याचा त्रास होता कामा नये.

सदर बैठकीस या आमदार दिलीप मोहिते-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!