प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-स्थानिक;वाशिम येथे ह्युमन वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रसेनजित चिखलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी प्रा.मोनिका प्रसेनजित चिखलीकर यांचा वाढदिवस व संविधान दिनाचे औचित्य साधून भटक्या विमुक्तांच्या पालावरील वस्ती शाळेत असा आगळा वेगळा वाढदिवस केक कापून साजरा केला.
वस्ती मधी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाटी, पुस्तक, पेन पेन्सिल इतर शालेय साहित्य आणि खाऊ वाटप केले. याच कार्यक्रमाची सुरूवात भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून केला.प्रा.मोनिका प्रासेंजित चिखलीकर यांचे सासरे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्मृतीशेष प्रा.डाॅ. सत्यजीत चिखलीकर व पती प्रा. प्रसेनजित चिखलीकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत समाजाच काहीतरी देणं लागत ह्या हेतूने त्यांचा वाढदिवस व संविधान दिन असा दुहेरी संगम लक्षात घेऊन अशा गोरगरीब पालावरील वस्ती शाळेत आपला वाढदिवस साजरा करून त्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
