पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत चाकण पोलीसांकडुन जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक चोरीचा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली मोटासाकल हस्तगत
चाकण वार्ता :- दिनांक २५ नोव्हेंबर
दिनांक २०/११/२०२१ रोजी फिर्यादी सत्यभामा भालचंद्र गुटटे रा. नाणेकरवाडी ता खेड जि. पुणे या तळेगाव चौक चाकण येथे नाक्यावर कामासाठी गेले असतांना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना शेतात कामावर नेण्याचा बहाणा करत त्याचे पल्सर गाडीवर बसवुन आळंदी फाट्यावरून आळंदी रोडने घेवुन जात असतांना गुट्टे यांना शंका आल्याने त्यांनी सदर इसमास इकडे कोठे नेत आहे असे विचारले असता त्याने गाडी थांबवुन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे ०७ ग्रॅमचे मनीमंगळसुत्र व पोत असे दागिने हिसकावून चोरून घेवून तो पल्सर मोटार सायकल वरून पळून गेला होता.
त्या बाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन मध्ये कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचे तपासात चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर गंभीर गुन्हयाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे यांचे सुचनां प्रमाणे तपास करून सदर गुन्हयातील अनोळखी इसमाचे फिर्यादीने सांगितलेले वर्णन तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे पोलिसांनी तपासचक्र फिरवत सदर गुन्हा हा आरोपी नामे गोरखनाथ काळुराम जाधव वय ३० वर्षे, रा. तळेगाव शिकापुर ता. शिरूर जि. पुणे याने केलेला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिलेली असुन त्यास सदर गुन्हयात दिनांक २२/११/२०२१ रोजी अटक करण्यात आलेली आहे. त्याचेकडुन सदर गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे मनीमंगळसूत्र व पोत असे ०७ ग्रॅम वजनाचे दागीने सुमारे २८,०००/- रू किंमतीचे तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटार सायकल नं. एम एच १२ सी व्ही ५३३१ सह एकुण ७८,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी गोरखनाथ काळुराम जाधव वय ३० वर्षे, रा. तळेगाव शिक्रापुर ता. शिरूर जि. पुणे याच्यावर यापुर्वी दोन गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कटटे् यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक, विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ होंडे, राफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, झनकर, पोना हनुमंत कांबळे, मनोज साबळे, भैरोबा यादव, मच्छिंद्र भांबुरे, पोकॉ निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, नितीन गुंजाळ, निखील शेटे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सागर बामणे हे करीत आहेत.