Post Views: 612
चाकण पोलीसांकडुन अवैध रित्या गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई ३,१५,३६८/-रु. किंमतीचा गुटख्याचा माल व ३,५०,०००/- रू. मालवाहतुक करणारी वाहने असा एकुण ६,६५,३६८/- रू. चा मुद्देमाल जप्त
दि. २६/११/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास चाकण पोलीसांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे रासे गावचे हददीतील चाकण शिक्रापुर रोडवर रासे फाटा येथे इसम दिनेश आंबादास सोळंके हा त्यांचे ताब्यातील स्कुटी नं एम एच १४ जे क्यु ६०९५ वर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ गुटखा अवैधरित्या विक्रीचे उद्देशाने वाहून नेणार आहे.
अनुषंगाने पोलीसांनी रासे फाटा येथे सापळा रचुन दिनेश आंबादास सोळंके वय २७ वर्षे रा. कडावीवाडी ता. खेड जि. पुणे यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात विमल पान मसाला व वि १ तंबाखु असा १६,२३८/- रू. गुटखा तसेच ५०,०००/- रू. किंमतीवी स्कुटी मोटार साकल असा एकुण ६६, २३८ /- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. दिनेश सोळंके यावेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगीतले की, सदरचा गुटखा हा त्याने चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परीसरात कमानी जवळ उभा असलेल्या टाटा एस टैम्पो क एम एच १४ जी डी ०९०२ याचेतुन आणलेला असल्याचे सांगीतल्याने चाकण पोलीसांनी चक्रेश्वर मंदिर परीसरातील कमानी जवळ जावुन टाटा एस टैटॅम्पो क एम एच १४ जी डी ०९०२ यास व त्याचा चालक लईस अहमद चौधरी वय २४ रा. म्हाळुंगे ता. खेड जि. पुणे मुळ रा. आसाम असे यास ताब्यात घेतले व त्याचे ताब्यातील टॅम्पो मध्ये विमल पान मसाला व वि १ तंबाख्नु असा सुमारे २,९९,१३०/- रु. गुटखा तसेच ३,००,०००/- रू किंमतीचा टॅम्पो असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे चाकण पोलीसांनी दिनेश आंबादास सोळंके वय २७ वर्षे रा. कडाचीवाडी ता. खेड जि. पुणे, २) लईस अहमद चौधरी वय २४ रा. म्हाळुंगे ता. खेड जि. पुणे मुळ रा. आसाम यांचेवर कारवाई करत त्यांचे ताब्यातुन विमल पान मसाला व वि १ तंबाखु असा एकुण ३,१५,३६८/- रू. किंमतीचा गुटख्याचा माल हा त्यांचे ताब्यातील स्कुटी नं. एम एच १४ जे क्यु ६०९५ तसेच टाटा सुपर एस टॅम्पो नं एम एच १४ जी डी ०९०२ या वाहनांसह एकुण ६,६५,३६८/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन वरील दोन्ही आरोपींवर चाकण पो स्टे गुरनं १४५३/२०२१ भा. द. वि. कलम ३२८, २७२,२७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयातील जप्त गुटख्याचा उत्पादक व पुरवठादार या बाबत सखोल तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कटटे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक, विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ झेंडे, पोलीस उप निरीक्षक, विनोद शेंडकर, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, रूषीकेश झनकर, पोना भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, मच्छिंद्र भांबुरे, निखील शेटे, पोकॉ निखील वर्पे, प्रदिप राळे, नितीन गुंजाळ, यांनी केलेली असुन सदर गुन्हयावा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे करीत आहेत.