दर्यापूर – महेश बुंदे
पोलीस स्टेशन दर्यापूर येथे दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी तहसीलदार योगेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली, पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन्द्र शिंदे, ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांचे प्रमुख उपस्थितीत आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने सर्व धर्मीय स्नेहमीलन सोहळा कार्यक्रम घेण्यात आला होता .

सदर कार्यक्रमांमध्ये जातीय सलोखा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमामध्ये दर्यापुर नगरी मधिल सर्व जातिधर्माच्या नागरिकांनी जातीय सलोखा बाबत तसेच दर्यापुर जातीय सलोख्या बाबत मते व्यक्त केली. सदर कार्यक्रमांमध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागी होते. आझादी का अमृत महोत्सव या दिनाचं औचित्य साधत मान्यवरांनी इतर समाजाबद्दल सुद्धा आत्मसन्मानाची भावना ठेवण्यासाठी विनंती केली तसेच दर्यापूर शहर हे हिंदू-मुस्लीम एकोप्याचा प्रतीक आहे, कुठल्याही प्रकारचा गालबोट या शहराला आजपर्यंत लागत आले नाही ही अभिमानाची बाब आहे, असाच एकोपा निरंतर टिकत राहो असे यावेळी ठाणेदार यांच्यावतीने मत व्यक्त करण्यात आले,.
