Post Views: 358
प्रतिनिधी महेश बुंदे ,दर्यापूर
दर्यापूर तालुक्यातील हिंगणी मिर्झापूर येथील काकड आरतीची सुरुवात जुने जाणते श्री. दिवंगत अजाबराव गावंडे, देविदास गावंडे, रामकृष्ण गवळी, ज्ञानदेवराव गावंडे, रघुनाथ नांदुरकर, रावसाहेब गावंडे, यांची परंपरा आजही दिलीप गावंडे, श्रीकृष्ण गावंडे, काशीनाथ नांदूरकर, ज्ञानेश्वर नांदूरकर, गणेशराव गावंडे, नवलसिंह ठाकूर, विजय आप्पा गावंडे, यांनी पुढे नेत आताच्या नवतरुण मंडळीनी ती जोमाने पुढे रेटली त्यात सर्वश्री शाम गावंडे, निलेश घोंगडे, अमोल गावंडे, जय गावंडे, गणेश गावंडे, अर्पित गावंडे, राहुल नांदुरकर, श्रीकृष्ण कावरे, अजय कावरे, ऋषिकेश गावंडे, सुमित गावंडे, या सर्वांनी संपूर्ण महिनाभर भल्या पहाटे सकाळी चार वाजता उठून संपूर्ण गावातून काकड आरती काढून गावात धार्मिक वातावरणात निर्माण केले.
यासाठी दिलीप गांवडे यांनी पुढाकार घेऊन पूर्णा नदीच्या संगमावर शानदार रोडग्यांचा कार्यक्रम करून सुंदर आयोजनाने या भक्ती मय वातावरणाची सांगता केली. त्याचे कौतुक करण्यासाठी पंच क्रोशीतील जेष्ठ मंडळीनि तसेच प्रा. डॉ. गजानन हेरोळे, महेश बुंदे, यांनी काकड आरती मध्ये असलेल्या मुलांचे मनभरून कौतुक केले.