प्रतिनिधी ओम मोरे :-
डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालत राहावं , हाच खरा संविधानाचा मान आहे -प्राचार्य श्री.पांडे सर
प्रतिनिधी/27 नोव्हेंबर
अमरावती:- संविधान दिनानिमित्त दि.26/11/2021रोजी माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माझे संविधान माझा अभिमान हा कार्यक्रम शासनाने दिलेल्या कोरोना नियमाचे पालन करून घेण्यात आला.या कार्यक्रमा मध्ये निबंध स्पर्धा, भाषन स्पर्धा, भीत्तीपत्रक स्पर्धा, फलक लेखन आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करण्यात आले. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या मध्ये मोठ्या संख्येत उत्साहाने सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयाचे मा.प्राचार्य श्री.पांडेसर होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती.भगत मॅडम,श्रीमती.इंगळे मॅडम होत्या, कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्री.गणोरकर सर PP भाषणामध्ये डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालत राहावं, हाच खरा संविधानाचा मान आहे, असे सविधान दिनानिमित्य विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले. तसेच कु.साक्षी कुशवाहा,कु.चंचल बागडे,कु.अद्वीती डंबाळे या विद्यार्थिनींनी सविधान दिनानिमित्य मनोगत व्यक्त केली. सहभागी स्पर्धकांचे उत्तेजनार्थ सत्कार मा.प्राचार्य श्री.पांडेसरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन सरोदे सारांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.तेजस्विनी देशमुख मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे संकलन श्री.अजय केव्हाडे सर (पी.टी.शिक्षक )यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी श्री सूरज इंगळे सर,श्रीमती.मनीषा आडगावकर मॅडम,कु.पल्लवी हाडे मॅडम, तसेच संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
प्रसिद्धी प्रमुख-प्रा.सचिन सरोदे सर माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय , अमरावती..