चाकण वार्ता :- संविधान दिन आज दि 26 नोव्हेंबर रोजी चाकण मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आहे.

26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन(Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.


भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.
26 नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे कारण म्हणजे 1930 मध्ये काँग्रेस लाहोर परिषदेने पूर्ण स्वराजची प्रतिज्ञा पास केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

खेड तालुक्यातील चाकण शहरामध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे प्रशालेच्या प्रारंगणामध्ये रंगमंदिर मध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .व संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांनी संविधान म्हणजे काय आणि त्यावर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपले विचार व्यक्त केले.यावेळी चाकण श्री शिवाजी विद्या मंदिर मधील ,प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक वृद, शिक्षिका ,कर्मचारी वर्ग तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थनी उपस्थित होते.

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला.
भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा सामुहिक संकल्प देखील यावेळी करण्यात आला.

संविधान हा भारतीयांना मिळालेला अमूल्य ठेवा अाहे. अनेक परकीय तत्त्वज्ञ म्हणतात की, भारतातून नेण्यासारखे सर्वात अमूल्य म्हणजे भारतीय संविधान आहे. संविधानामुळे देशाच्या विविध परंपरा, संस्कृती, सण, समारंभ, धर्म, जाती, जमाती अशा विविधता एकसंघपणे बांधणी करून संपूर्ण देश एकसंघ करण्याचे काम संविधानाने केले आहे. संविधानाची सुरुवातच आम्ही भारतीय लोक अशी असून हे संविधान स्वतःप्रत अर्पित केलेेले आहे.
संविधान बनवायला इतके दिवस लागले
संविधान बनवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे पूर्णपणे तयार झाले. भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. संविधानाची मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती. हे उत्कृष्ट कॅलिग्राफीद्वारे इटॅलीक अक्षरात लिहिलेले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आल्या होत्या. आजही भारताच्या संसदेत त्या सुरक्षितपणे ठेवल्या आहेत.संविधानाचा उद्देश
देशात राहणार्या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता, समानता असावी आणि सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संविधान बनवले गेले. भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना लिहिली गेली आहे, ज्याला भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावना पत्र म्हणतात. या प्रस्तावनेत, ते भारतातील सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता सुरक्षित करते आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवते.
