प्रतिनिधी प्रकाश साकला बुलढाणा:-
बुलढाणा :- देऊळगाव राजा गेल्या ३-४ दिवसापासून विद्युत महावितरण कंपनीने देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी पंपाची लाईट तोडणीचा सपाटा लावला असून कृषी पंपाची वीज तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी,असे निवेदन आज दि.२६/११/२०२१ रोजी मा. कार्यकारी अभियंता म.रा.वि. वि.कंपनी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले, एककीकडे थंडीचे दिवस सुरू झाले असून त्यातही शेतकऱ्यांना रात्री ६ तास लाईट दिली जाते आणि त्यातही आता महावितरण कंपनीने वीज तोडणीचा सपाटा लावला आहे शेतकऱ्यांची ऐन हरबरा, शाळू, मक्का, गहू पेरणी सुरू झाली असून शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास महावितरण हिरावून घेत आहे, महावितरण कंपनीची ही हुकूमशाही खपून घेतली जाणार नाही, तात्काळ शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज तोडणी थांबवावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १/१२/२०२१ ला उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय, देऊळगाव राजा यांच्या कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
यावेळी निवेदन देतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, विधानसभा अध्यक्ष सि.राजाचे मधुकरराव शिंगणे, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे, शेरे पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.
- शेतकऱ्यांवर अन्याय कराल तर याद राखा.!
अस्मानी संकटामुळे, अतिवृष्टी,मुळे शेतकरी आधीच हताश झाला आहे, त्यातच आता कसे बसे पीक तो घेण्याचा प्रयत्न करत असतांना आता महाराष्ट्र विद्युत कंपनी अधिकारी ,कर्मचाऱ्यांची हुकमशाही सुरू झाली आहे ,कोणती ही पूर्व सूचना न देता,शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचं काम संबंधित अधिकारी,कर्मचारी करत आहे. परन्तु शेतकऱ्यांवर अन्याय कराल तर स्वाभिमानी चा सामना करावाच लागेल हे लक्षात ठेवा.
- मधुकर शिंगणे(स्वाभिमानी युवा नेते),देऊळगाव मही