प्रतिनिधी विवेक माेरे
नांदगाव खंडेश्वर:- तालुक्यातील शिरपूर येथे मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 10 जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये नागरिकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचसोबत बॉम्ब स्फोट सुद्धा घडवून आणला. इतिहासातील सर्वाधिक भीषण आणि भयावह अशा या दहशतवादी हल्ल्यामुळे आज ही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. या हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमावावा लागला तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते.
