दोन गटात वाद, गुन्हयातील दोषींवर वाशिम पोलीसांची कडक कारवाई

रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द गावात झालेल्या दोन गटाचे वादातील गुन्हयाचे दोषींवर वाशिम पोलीसांची
कडक कारवाई
.

प्रतिनिधी फुलचं भगत


वाशिम:-पोलीस स्टेशन रिसोड हयातील ग्राम लोणी खुर्द हे गाव मराठवाडयाच्या व बुलढाणा जिल्हयाच्या सिमेवरील आहे. लोणी खुर्द गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्रीतपणे गुन्यागोविंदाने राहतात. काही दिवसांपुर्वी लोणी खुर्द गावामध्ये महापुरुषांच्या पोस्टरवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. सदर वादाचे प्रत्यंतर होवुन, दिनांक २०/११/२०२१ रोजी गावातील एका गटाने गैरकायद्याची मंडळी जमवुन दुसऱ्या गटातील काही लोकांना कुर्‍हाड, लोखंडी गज व काठी अशा शरवांनी जिवाने मारण्याचे उद्देशाने गंभीर मारहाण केली होती. सदर घटनेची माहीती रिसोड पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे, ठाणेदार पो. नि. सारंग नवलकार, सपोनि महेंद्र गवई, सुबनावळ, पोउपनि गायकवाड, सुरगडे असे पोलीस अंमलदारांसह तात्काळ पोहचले.

घटनेचे गांभीर्य
ओळखुन गुन्हयातील जखमी इसमांना पोलीस गाडीतुन उपचाराकरीता तात्काळ गामीण रूग्नालय रिसोड येथे
रवाना केले. तसेच घटनास्थळी पुर्णतः शांतता निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण
होवु दिला नाही. गुन्हयातील जखमी रामभाउ पारवे यांचेवर रिसोड रूग्णालयात प्राथमिक उपचार झालेवर
लागलीच त्यांचे बयानावरून १९ आरोपी व इतर यांचेविरुध्द दिनांक २१/११/२०२१ रोजी पोलीस स्टेशन
रिसोड येथे सहकलम ८ पोक्सो, सहकलम 1 &00. 30006). 1 (२) (va). 100 (w) अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

त्यानंतर गुन्हयामध्ये आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या एकुण २० करण्यात आली आहे. गुन्हयातील चार आरोपींना ताब्यात घेवुन अटक केली. गुन्हयातील इतर पाहिजे आरोपी हे फरार असल्याने, गुन्हयाचे तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे यांचे अधिनस्त
पोलीस अधिकारी व अमलदार यांचे ४ वेगवेगळी आरोपी शोध पथके तयार केली. सदरच्या शोध पथकांनी
अहोरात्र परिश्रम घेवुन गुन्हयातील उर्वरीत १६ पाहिजे आरोपी यांना ताब्यात घेवुन अटक केलेली आहे.


गुन्हयाचा तपास वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय
पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे हे करीत आहेत.तरी सदर गुन्हयामधील एकुण २० आरोपी असुन, सर्व २० आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. लोणी खुर्द गावात १ अधिकारी व २ पोलीस अमलदार यांचे फिक्स गार्ड लावण्यात आलेले असुन, त्याठिकाणी १ एस.आर.पी.एफ. सेक्शन तैनात करण्यात आलेले आहे गुन्हयातील पिडीत/जखमी यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. गावामध्ये सध्या शांततेचे वातावरण असुन, पोलीसांनी सदर प्रकरणी दोषीवर अतिशय कडक कायदेशीर कारवाई करून लोणी खुर्द व आजुबाजुचे परिसरात कोणतेही तणावपुर्वक वातावरण निर्माण होवु दिलेले नाही. सदरची घटना घडल्यानंतर दोन्ही समाजाच्या प्रतिनीधींची मा. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री, बच्चन सिंह व
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे यांनी वेळोवेळी बैठका घेवुन त्यांना शांतता राखण्याचे
अवाहन केले व त्याप्रमाणे त्यांनी सुध्दा चांगला प्रतिसाद दिला. पोलीसांनी केलेल्या कारवाईवर सदरच्या
प्रतिनीधीनी समाधान व्यक्त केले व आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

तरी कोणीही समाजकंटक व्यक्तींनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याबाबतचे बेकायदेशीर कृत्य
करू नये, असे आढळल्यास दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाशिम जिल्हयातील
जनतेस वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, कोणीही अफवांवर विश्वास ठेवु
नये तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे कृत्य कोणी समाजकंटक करीत असल्यास त्याबाबतची माहीती तात्काळ पोलीसांना देवुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे पोलिस विभागाकडुन आवाहन करण्यात आले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!