वाशिम:-दिनांक २६/११ / २१ भारतीय संविधान दिवस म्हणुन पाळला जातो. भारतीय सविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरीता २६ नोव्हेंबर हा दिवस साजराकरण्याकरीता पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी/अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी हजर राहुन भारताचे संविधान उददेशाचे वाचन करण्यात आले.
संविधान दिनाचे औचित्य साधुन पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे वाशिम जिल्हयातील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री.नामदेव चंद्रभान कांबळे पद्मश्री यांना प्रमुख पाहुणे म्हणुन निमंत्रित करण्यात आले होते. मा.बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आज दिनांक २६/११/०८ रोजी मुंबई येथे ताज हॉटेलवर झालेल्या हल्यातील शहीद जवान, तसेच वाशिम जिहयातील सन २०१३ गुन्हेगारांना पकडत असताना गुन्हेगारांनी चाकुने केलेल्या हल्यात शहीद झालेले पोका ११८८ हिरा ननु रेघोवाले नेमणुक पोस्टे अनसिंग, १९६५ साली भारत पाक युध्दा दरम्यान शत्रुशी लढताना शहीद झालेल्या पांगराबंदी, मालेगाव येथील भारतीय सैन्य दलातील शिपाई ४५३६५४१ यशवंत सरकटे, जम्मु काश्मिर येथे ओपी रक्षक म्हणुन कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले मुंगसाजी नगर,मालेगाव येथील लान्स नायक १४४८२४०५ दगडु लहाने, जम्मु काश्मिर येथे ओपो रक्षक म्हणुन कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले वाटोद ता मानोरा येथील २७८८१३७ निरंजन दयाल ठाकरे श्रध्दांजली अर्पित करण्यात आली, त्यावेळी वाशिम जिल्हयातील शहिद जवानांचे कुटुंबिय कार्यक्रमास उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. कांबळे यांनी उपस्थित सर्वाना संविधान दिन व शहिद दिनाचे महत्व समजावुन सांगितले.
श्री कांबळे यांनी स्व:तच्या जिवन प्रवासाबददल सांगताना उपस्थित सर्व विदयार्थांना त्यांनी पद्मश्री पर्यंत पोहचण्याकरीता किती खडतर प्रवास केला याबाबत सांगुन जिदद आणि मेहनितचे महत्व पटवुन दिले.वाशिम जिल्हयातील वेगवेगळया शाळेतील विदयार्थाकरीता रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित स्पर्धेकरीता जवाहर नवोदय विदयालय,कानडे इंटरनॅशनल,हॅपी फेसेस,माऊंट कारमेल,केंद्रीय विदयालय येथील विदयार्थी/विदयार्थीनी हजर होते. त्यापैकी चित्रकला स्पर्धेत माऊंट कारमेल शाळेच्या कुमारी विजया सकपाळ हिने प्रथम, कुमारी उन्नती शिंदे हिने द्वितीय तर जवाहर नवोदय विदयालयाची कुमारी गौरी विसपुते हिने तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धे करीता माझे संविधान माझा अभिमान तसेच माझ्या भारताचा राष्ट्रीय ग्रंथ संविधान हे विषय देण्यात आले होते. निबंध स्पर्धेत शिवाजी विदयालयाचा कुमार प्रेम संजीव घुगरे यांनी प्रथम, माऊंट कारमेल विदयालयाची कुमारी श्रेया धनंजय निराळे हिने द्वितीय तर जवाहर नवोदय विदयालयाचा कुमारआदेश निचल हयाने तृतीय क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धा ही ग्रुप अॅक्टीव्हीटी असल्याने त्यात जवाहर नवोदय विदयालयाने प्रथम, कानडे इंटरनॅशनल विदयालयाने द्वितीय तर हॅपी फेसेस विदयालयाने तृतीय क्रमांक पटकावुन आपआपल्या शाळेचे नाव उंचाविले.सर्व विजेत्याना प्रशस्ती पत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
नमुद कार्यक्रमाकरीता एकुण १३ शाळांचे १०५ विदयार्थी तर १२ शिक्षक हजर होते. अल्पोपहार, बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा संविधान कार्यकम मा. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात, श्री. गोरख भामरे अपर पोलीस अधिक्षक वाशिम, श्री.जाधव पोलीस उप अधिक्षक तथा पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम,श्री.खंडेराव पोलीस निरिक्षक जिल्हा विशेष शाखा,राखीव पोलीस निरिक्षक पवार, पोउपनि चौधरी:मपोउपनि अश्विनी धोंडगे,इथापे,कल्याण शाखा, जिविशा येथील कर्मचारी यांचे सहकार्याने संप्पन झाला.