दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील बायस्कार कुटूंबात वंश परंपरेने अल्पसे दिव्यांग व्यक्तिमत्त्व आढळतात त्यापैकीच मुबंई येथे कंपनीत कर्तव्यावर असलेले श्री गणेश बायस्कार यांनी एका अल्प दिव्यांग असलेल्या वैशाली नावाच्या मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला. श्री गणेश बायस्कार हे मूळचे तोंगलाबादचे रहिवासी असून ते माळी समाजाचे आहेत तर मुलगी मुबंई येथील असून ती बोध्द समाजाची आहे.
