बुलढाणा चिखली वार्ता:-दि. 25/11/2021 बुलडाणा जिल्हयातील पोलीस स्टेशन चिखली येथे दिनांक 17/11/2021 रोजी फिर्यादी मनन कमलेश पोपट वय 27 वर्ष रा. क्रिडा संकुल समोर, खामगांव रोड चिखली यांनी तोंडी रिपोर्ट दिला की, दिनांक 16/11/2021 रोजी रात्री 10/00 वा. दरम्यान फिर्यादी यांचे वडील कमलेश डायालाल पोपट वय 61 वर्ष हे त्यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानमध्ये दुकानचे लहान शेटर अर्धे उघडे ठेवुन हिशोब करीत असतांना अनोळखी तीन इसमांनी दुकानात प्रवेश करुन बंदुकीचा दाखवुन तलवारीने वार केले व जबरदस्तीने फिर्यादीच्या वडीलांच्या गळयातील सोन्याची चैन व नगदी 15 ते 20 हजार रुपये चोरुन नेले.
चोरी करतांना तलवारीने व बंदुकीच्या मुठीने तोंडावर व पोटावर मारहाण करुन जीवानीशी ठार मारले आहे , मनन यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक 746/2021 कलम 302, 394, 34 भादवी. सहकलम 4,25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला होता.
पोलीस स्टेशन चिखली येथे गंभीर खुनाचा,व जबरी चोरीचा गुन्हा दाखल होताच अरविंद चावरिया पोलीस अधिक्षक बुलडाणा, बजरंग बनसोडे अपर पोलीस अधिक्षक,सचिन कदम -उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा ,यांनी घटनास्थळाला भेट देवुन यांचे मार्गदर्शन व निर्देशाच्या अनुषंगाने गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक ना.लांडे ठाणेदार व स.पो.नि अमोल बारापात्रे पोलिस स्टेशन चिखली यांनी सुरु केला.
गुन्हयाच्या तपासात पोलीस स्टेशन चिखली, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा, सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथील अधिकारी व अंमलदार यांचे एकुण 07 तपास पथके तयार करण्यात आले.तपास पथकाच्या मदतीने रेकॉर्डवरील गुन्हेगार, गोपनिय बातमीदार, भौगोलीक परिस्थीती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हयाचा सखोल व बारकाईने तपास करण्यात आला.
या अश्याचे पध्दतीचा वापर करुन पोलिस स्टेशन देवुळगाव राजा येथे पण दि.3/11/2021 रोजी नोंद झाला होता. गुन्हयातील आरोपीतांचे वर्णन साम्य असल्याने देवुळगाव राजा तपास पथक पो.नि.जयवंत सातव ,पो.उपनि किरण खाडे, यांचे पथकासह तपास सुरु करण्यात आला.
गोपनिय माहीतीच्या आधारे देवुळगाव मही, धोत्रा नंदाई, गावात कोंबीग ऑपरेशन राबविण्यात येवुन आरोपी 1)राहुल किसन जायभाये वय 23 वर्ष रा. देऊळगांवमही ता. देऊळगांव राजा 2) राहुल अशोक बनसोडे वय 20 वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा 3) नामदेव पंढरीनाथ बोंगाणे वय 20 वर्ष रा. धोत्रा नंदई ता. देऊळगांवराजा यांना दिनांक 25/11/2021 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली.
सदर गुन्हयातील अटक आरोपींना तपास दरम्यान चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, यातील आरोपी राहुल किसन जायभाये हा सहा महिन्यापुर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात होम थेटर घेण्यासाठी आला होता होमथेटरच्या किंमतीवरुन त्यावेळेस आरोपी व कमलेश पोपट यांचे वाद झाले होते व आरोपी याने मृतक कमलेश पोपट यांचेमध्ये वाद झाल्यानंतर मृतक कमलेश पोपट याने आरोपी राहुल जायभाये यास भिकारडया तुझी औकात नसेल तर घेतो कशाला, वस्तुची किंमत कशाला करतो असे म्हणुन आरोपीच्या आई वडीलांवरुन शिव्या दिल्या होत्या. तसेच आरोपी राहुल जायभाये चे वडील एका महीन्यापुर्वी मयत झाले असुन कमलेश पोपट यांचा जुन्या घटनेचा राग डोक्यात ठेवुन त्यांना धडा शिकवण्याचा कट आरोपींनी रचुन हत्या केली.