” मला दूषित होण्यापासून वाचवा ” – इंद्रायणी मातेची भक्तांना हाक….
•पुणे/ ओम मोरे
25 नोव्हेंबर 2021
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. पंढरपूर नंतर इंद्रायणी नदीकाठी वसलेले देहू आणि आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांशी वारकऱ्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक तिथे जातात. आळंदीला संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे तर देहू गावात संत तुकारामांचा जन्म झाला होता आणि याच गावात संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी जातात. या ठिकाणच्या इंद्रायणी माता नदीत अनेक भाविक स्नान करतात. तर काही भाविक इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून पितात. इंद्रायणी नदी आणि तिच्या काठी वसलेल्या देहू आणि आळंदी गावांना चांगला इतिहास असून ते तीर्थक्षेत्र आहेत. मात्र आता इंद्रायणीचं पाणी अस्वच्छ झालं आहे. या पाण्यात स्नान करणं तर लांबच हातपाय देखील धुणे आरोग्यास हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे या नदीची साफसफाई होणे अत्यंत गरजेचे आहे.

श्री क्षेत्र देहू-आळंदीला आलेले वारकरी ज्या पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात, त्या नदिला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आज रविवार,दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण तसेच समाजसेवेचे क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे यांनी संस्थेच्या शाखा पुणे जिल्हा पदाधिकारी टीम सह आळंदी येथील इंद्रायणी सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष हभप.विठ्ठल शिंदे महाराज यांची आळंदी येथे भेट घेऊन इंद्रायणी स्वच्छतेबाबत सखोल चर्चा केली. यावेळी श्री.देवा तांबे यांनी या इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेसाठी संबंध महाराष्ट्रातील भक्तांनी हातभार लावावा असे आवाहन केले.

यावेळी या बैठकीस संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.मनिषा बेलोसे मॅडम ठाणे हुन आवर्जून उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्षा – अंजू ताई सोनवणे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष अनघा दिवाकर, जिल्हा उपाध्यक्षा विद्या पेन्सिलवार, जिल्हा सचिव, कल्पना तळेकर, जिल्हा सहाय्यक सचिव, मिनाक्षी मेरुकर, जिल्हा महिला संघटक साधना दातीर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,
काळे प्रतिमा, कार्यकारिणी सदस्या – शैलजा मोरे, जिल्हा सल्लागार – अशोक पांढरकर, कार्यकारिणी सदस्या – शैलजा मोरे आदी पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित राहून संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे तसेच इंद्रायणी सेवा फौंडेशन,आळंदी चे अध्यक्ष हभप.विठ्ठल शिंदे यांच्या सोबत इंद्रायणी स्वच्छता मोहीम संदर्भात विशेष चर्चा केली.
त्यामुळे लवकरच इंद्रायणी नदितून स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसेल, असा विश्वासही संस्थापक श्री.देवा तांबे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी इंद्रायणीसह महाराष्ट्र राज्यातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या सर्वच नद्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प पर्यावरण संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांनी बोलून दाखवला.
■ राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत ■