दर्यापूर – महेश बुंदे
शिवसेना नेते युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा. ना. आदित्य ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राष्ट्रीय सचिव मा. वरून सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य मा. रूपेश कदम व युवासेना अमरावती लोकसभा विस्तारक मा. राजसाहेब दीक्षित यांच्या सूचनेनुसार तसेच युवासेना अमरावती जिल्हा प्रमुख प्रमोद धानोकर आणि युवासेना अमरावती उपजिल्हा प्रमुख अंकुश कावडकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात युवासेने तर्फे ४५ युवासैनिकांनी रक्त देऊन बाळासाहेबांना वंदन केले.
