वरुड येथील घरफोडया करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

रवी मारोटकर ब्युरो चीफ

अमरावती वार्ता :- पोलीस स्टेशन वरुड येथे दिनांक १५/११/२०२१ रोजी फिर्यादी सचिन शेषराव पुसदेकर रा. वरुड ,यांनी पोलिस स्टेशनला येवून रिपोर्ट दिला की, कोणीतरी अज्ञात चोराने घरी कोणीही नसतांना घराचा कोडा तोडुन घरातुन सोन्या चांदीचे दागीने तसेच रोख नगदी असा मुद्देमाल चोरून नेला.
अशा फिर्याद वरून पोलिसांनी अपराधचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण जिल्हयातील वरुड शहरात वाढत्या घरफोडीच्या घटना पाहता मा. पोलिस अधिक्षक श्री अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणने बाबत निर्देशित केले होते.

त्या अनुषंगाने दिनांक २४/११/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस स्टेशन वरुड हद्दीत पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक माहीती मिळाली की, वरुड येथील घरफोडी करणारा आरोपी हा काही चांदीचे दागीने विकण्याचे तयारीत आहे. व त्याने लाल शर्ट व निळा जिन्स पॅन्ट आणी पाठीवर निळया रंगाची बॅग घेवून फिरत होता. आणी तो खाजगी वाहणाने नागपुर गणेश पेठ बस स्थानका कडे गेल्याची माहीती मिळाली.

पोलिसांनी तात्काळ नागपुर ला जावुन गणेश पेठ भागात जावून त्याचा शोध घेतला असता एक इसम लाल शर्ट व निळा जिन्स पॅन्ट घतलेला हा नागपुर बस स्थानकात संशयस्पद दिसला त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता तो उडवा उडवीचे उत्तर देवु लागला त्यास आणखी विश्वासात घेवून पोलिसी खाक्या दाखवून व बारकाईने विचारपुस केली असता त्याने सांगीतले की नागपुर वरुन वरुड जावुन तेथील मधील बंद घराची पाहणी करुन रात्री दरम्यान मी ते घराचा कोडा लोखंडी टामीने तोडुन आत प्रवेश करुन घरातील सोन्या चांदीचे दागीने मोबाईल नगदी पैशाची चोरी केल्याची कबुली दिली.

त्याचे ताब्यातुन चांदीचे साहीत्य,मोबाईल व नगदी असा एकुन ४१७०० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन वरुड अभिलेखावरील एकूण गुन्हे ५ गुन्हे उघडकीस आले. तसेच नमुद सराईत आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नमुद आरोपीस पुढील तपासकामी पोलिस स्टेशन वरुड यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात पो.उप.नि. आशिष चौधरी, स.पो.उप.नि. संतोष मुंदाने, ना.पो.कॉ रविंद्र बावणे, ना.पो.कॉ बळवंत दाभने, पो.का दिनेश कनोजीया, पो.को पंकज फाटे, पो.हे.कॉ नितीन कळमकर व सायबर सेलचे धापड, सरीता चौधरी तसेच पोलिस स्टेशन वरुड चे स.पो.उप.नि. मडावी व पो.ना विनोद पवार यांनी केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!