पुणे-नाशिक महामार्ग समस्यांचे आगार,कधी मिळणार..? मोकळा श्वास..विकास फक्त कागदावरच

पुणे वार्ता :- लग्नसराई मुळे पुन्हा वाहतुकीची कोंडी पुन्हा एकदा पुणे चाकण नाशिक महामार्ग रोडवर शहरात होऊ लागल्याचे चित्र दिसत होते. आज पासुन लग्नांचा धुमधडाका सुरु झाल्याने सायंकाळनंतर पुणे नाशिक महामार्गावर वहातुकीच्या कोंडीत कामगार व-हाडीसह,प्रवाशी, अडकल्याचे चित्र होते. भाम नदी , इंद्रायणी पुलावर वहान बंद पडल्याने अरुंद रस्ते यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. त्यात चाकण औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ,राजगुरुनगर मोशी मध्ये मोठ्या वाहतुककोंडीचा सामना करावा लागला आहे.


वाहनांच्या लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतुककोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. येथील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस निरिक्षक व कर्मचारी रात्रीपर्यंत प्रयत्न करत असल्याचे बघायला मिळाले.
राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव, आळेफाटा शहरात वाढत्या रहदारीमुळे पुणे – नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतुककोंडीमुळे बायपास करण्यात आले आहेत. मात्र, नारायणगाव वगळता सर्व बायपासची कामे संथगतीने सुरू आहे. याचा नाहक त्रास स्थानिकांना व प्रवाशांना सहन करावे लागत आहे.

ट्राफिक समस्या जैसे थे

येथील वाहतुककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. अशात विकेंड आणि लगीन तिथी अल्यास वाहतुककोंडी समस्या वाढतच चालली आहे. या वाहतुक कोंडीचा ताण पोलीस यंत्रणेवर येत आहे. त्यामुळे बायपासची कामे , चाकण येथील उड्डाणपूल ,रोडची काम युद्धपातळीवर व्हावीत अशी मागणी प्रवाश्यांकडुन सातत्यांने होत आहे.

ट्रॅफिक मध्ये तब्बल 30 मिन अडकली रुग्णवाहिका

त्यात मोशी येथे उसाचा ट्रक्टर बंद पडल्यामुळे ट्राफिक जाम, यामुळे तब्बल15 ते 20 मिनिट मोशी चौक येथे Ambulance (रुग्णवाहिका) ट्राफिक मध्ये अडकली.
जन सामान्यांचे जीवन कवडी मोल झाले आहे.
ह्या ट्राफिक चा प्रंचड असा मनस्ताप करावा लागत आहे.

बंद पडलेला उसाचा ट्रॅक्टर

वारंवार बातम्या देऊन तक्रारी करून पण संबंधित शासकीय यंत्रणा , लोकप्रतिनिधी, नेते मंडळी, डोळेझाक करत आहे. निवडणूक आली की मोठी आश्वासन देऊन , मोठ्या मोठ्या बाता मारतात ,मोठी स्वप्न दाखवून मत मिळवतात नंतर मात्र त्याची पूर्तता शुन्य. याच ज्वलंत उदाहरण म्हणजे खेड,राजगुरूनगर, चाकण ,मोशी मधील ट्रॅफिक, रखडले उड्डाणपूल, रोडची कामे विकास हा फक्त घोषणा आणि कागदावरच राहिला असल्याचे सध्या चित्र आहे.कधी होणार वाहतुक कोंडितुन सुटका?
कधी मिळणार …मोकळा श्वास असे येथिल स्थानिक नागरिक करत आहे.

ट्राफिक जाम
बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!