Post Views: 746
दर्यापूर – प्रतिनिधी महेश बुंदे
तालुक्यातील घोडचंडी येथील सुपुत्र व भारत देशाचे रक्षण करतांना शहीद झालेले शहीद उमकेश्वर कडू यांचा गौरवार्थ तालुका क्रीडा संकुल दर्यापूरला शहीद उमकेश्वर कडू क्रीडा संकुल हे नाव देण्यासाठी कोळी महादेव युवा सेना तर्फे तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी गावातील सुपुत्र कोळी योध्दा शहिद उमकेश्वर कडू भारतकोळी महादेव युवा सेना तर्फे मागणी मातेचे रक्षण करता करता शहिद झाले त्याचे शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले.
घोंडचंदी गावात त्याचे नावाचे प्रवेशव्दार व पुतळा आहे व परिसरातील सर्व गावामंधे शहिद दिवस साजरा केला जातो व क्रिडा संकुल मध्ये त्याचा आदर्श घेऊन युवा वर्ग ईडियन आर्मीचा सराव करतात, दर्यापूर तालुक्याचे आन बान छान आहेत, त्याची सत्कारात्मक आठवणीसाठी दर्यापूर क्रिडा संकुलला त्याचे नाव देण्यात यावे हिच त्यांच्या बलीदानास खरी श्रद्धांजली ठरेल. समस्त घोडचंदी गावातील गावकरी आणि दर्यापूर तालुक्यातील विवीध संघटनेतर्फे व कोळी महादेव युवा सेना तर्फे मागणी केल्या जात आहे.
दर्यापूर क्रिडा संकुलला शहीद उमकेश्वर कडू यांचे नांव देण्यात यावे अशी मागणी करून आठ दिवसामध्ये कार्यवाही करण्यात यावी व नाही केल्यास संघटनेतर्फे क्रिडा संकुल ला शहिद उमकेश्वर कडू यांचे नाव देण्यात येईल असा ईशारा कोळी महादेव युवा सेने कडून दिला आहे त्या निवेदन ची प्रतिलिपी दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांना सुद्धा दिली आहे.
निवेदन देतेवेळी कोळी महादेव युवा सेनेचे अध्यक्ष योगेश बुंदे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आला, त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सतीश काळे, पुरुषोतम फुलकर, उमेश बुध, भुषण बुध, रोशन ठाकरे, रोशन आमोदे, चेतन कुटेमाटे, चेतन रामागडे, गणेश बुध, गोपाल रामागडे, कीशोर थोरात, पिंटु रामाझडे,
तुळशीदास अडबोल, मारोती येलोने, दिनेश ब्रम्हखेडे, मंगेश बुंदे, स्वप्नील अडबोल, गजानन बुध, अंकुश बुध, विलास ठाकरे, दिपक रामागडे, अंकुश रामागडे, सोपान पेटे, विकास खेडकर, मंगेश धांडे, अक्षय तेलंग,चेतन पाचपवार, रमन काळे,राहुल घोडे
व ईतर समाज बांधव उपस्थित होते आता यावर स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात यावर लक्ष लागले आहे.