Post Views: 705
दर्यापूर -प्रतिनिधी महेश बुंदे
सध्या रब्बी पिकांची पेरणी चालु आहे या पिकांसाठी पेरणीपूर्व पाणी देण्यासाठी विज पुरवठा अत्यावश्यक असुन विज पुरवठा नसेल तर रब्बी पिके कशी पेरावी एकतर या वर्षी अगोदरच अतिपावसाने खल्लार परिसरातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली असुन त्यातूनच वर्षभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेला विजपुरवठा खंडित करण्याच्या सुचना खल्लार महावितरण केंद्राकडून परीसरातील शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याने शिवसेना दर्यापूर तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी खल्लार परीसरातील शेतकरी वर्गासह महावितरण केंद्र, खल्लार गाठून शाखा उपअभियंता निखील पडोळे यांच्यासमोर समस्या मांडुन शिवसेनेच्यावतीने सध्यातरी विज पुरवठा खंडित करु नये असे सुचोवात केले यावेळी खल्लार सर्कल मधील शेतकरी उपस्थित होते.