Post Views: 397
दर्यापूर – प्रतिनिधी महेश बुंदे:-
दरवर्षी दिवाळीनिमित्त तालुक्यातील विविध पारधी वस्तीमध्ये जाऊन दिवाळीचा फराळ वाटप केल्या जातो. गेल्या अकरा वर्षापासून उपक्रम श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा येथून दर्यापूर तालुक्यातील विविध संस्था प्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या सहकार्याने राबवला जात आहे.
गेल्या वर्षीपासून त्यामध्ये आणखी भर पडली ती पार्लेजी बिस्कीटचे पुढे यांची, यावर्षी सुद्धा अकबानी ट्रेडिंग बनोसा दर्यापूरचे मालक इरफान इद्रिषभाई अकबानी यांचे चिरंजीव यांच्या सहकार्याने विविध ठिकाणच्या पारधी पायांवर जाऊन मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार्लेजी बिस्कीट पुढे यांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मामना टोंगलाबाद भराडी वस्ती लेहगाव बनोसा येथील पारधी पाडा, लोधापूर, चंडिकापूर, आमला या ठिकाणी समावेश आहे. या कामी गणेशराव लाजुरकर, तुळशीदास धांडे, धनंजय देशमुख, राजूभाऊ नागे, राजूभाऊ कोल्हे, नितेश वानखडे, दत्ता कुंभारकर, संतोष मिसाळ, तोशिप भाई यांनी परिश्रम घेतले.