Post Views: 841
चांदूर रेल्वेचे तहसिलदार राजेंद्र इंगळे यांचे आदेश
चांदूर रेल्वे – प्रतिनिधी धिरज पवार :-
अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या एका ट्रकला तब्बल ४ लाख २२ हजारांचा दंड ठोठावल्याचे आदेश चांदूर रेल्वेचे तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी काढले. यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अवैधरित्या कन्हान रेतीची वाहतूक करतांना ट्रक क्रमांक एमएच २९ टी ०४९१ ला चांदूर रेल्वे चे नायब तहसीलदार एल. एस. तिवारी, व्ही. पी. वाढोणकर, तलाठी वाय. एम. वंजारी, दीपक चव्हाण या पथकाने पकडले होते. सदर ट्रक जप्त करून तहसील कार्यालय परिसरात आणला होता. याचा पंचनामा केल्यानंतर या ट्रकमध्ये तब्बल ९.८२ ब्रास रेती आढळून आली. हे वाहन अर्जुन ठाकुर यांच्या मालकीचे आहे. यानंतर तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी अवैध खनिज दंड २ लाख २२ हजार ७६८ व वाहन दंड २ लाख रूपये असा एकुण ४ लाख २२ हजार ७६८ रूपयांचा दंड ठोठावला आहे.