प्रतिनिधी रविकांत जाधव:-
पुणे वार्ता:- माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार देशभरामध्ये १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मोदी सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागरण अभियान उभारले आहे.

मागील काही वर्षात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरनामुळे महागाई गगनाला भिडली असून या वाढत्या महागाई मुळे सामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. 2014 ला देशात भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता स्थापन केली. नवीन सरकार व त्यांची आश्वासन बघून नागरिकांना प्रत्येक वस्तु स्वस्त दरात मिळेल असे वाटायला लागले होते परंतु सद्यस्थितित पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल अशा बहुतेक दैनदिन जीवनातील वस्तुचे दर खुप महागल्या मुळे सामान्य व गरीब जनतेची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली असून याचेच निषेध नोंदविन्याकरिता महाराष्ट्र काँग्रेस कमिटी तर्फे महागाई विरोधात प्रभात फेरी जनजागरण अभियान उभारले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर चाकण येथे जन जागरण अभियाना अंतर्गत चाकण शहरात माणिक चौक ते चाकण मार्केट यार्ड पर्यंत पदयात्रा व मार्केट यार्ड येथे कोपरा सभा पार पडली याबाबत चाकण शहर काँग्रेस कमिटीद्वारा जिल्हा काँग्रेस कमिटी जन जागरण रँलीचे माणिक चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले तद्नंतर पदयात्रा सुरू होऊन पुढे मार्केट येथे कोपरासभा संपन्न होऊन उत्कृष्टपणे सर्व कार्यक्रम नियोजनाप्रमाणे पार पडले असून महिला व सर्व सामान्य नागरीकांचा मोठा सहभाग कार्यक्रमामध्ये होता.

या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप,जिल्हा निरिक्षक दादू शेठ खान,उत्कर्षाताई रूपवते,उपाध्यक्ष संग्रामदादा महोळ,महेशबापु ढमढेरे,सीमा सावंत,पृथ्वीराज पाटिल,संजय उभे,विजय कदम,जमीरभाई काझी,काळुराम कड,किसान काँग्रेसचे चंद्रकांत गोरे,सुभाष होले,गीताताई मांडेकर,अमोल दौंडकर,आनंद गायकवाड,अमोल जाधव,दिपक थिगळे,निखिल थिगळे,सुनिल मिंडे,भास्कर तुळवे,निखील कविश्वर,मयुर आगरकर,जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड पाटिल यासह पदाधिकारी व कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






