नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा,पी.एम.पार्लेवार

नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा एम.एस.एम.ई. मुंबई विभागाचे संचालक पी. एम. पार्लेवार यांचा नवउद्योजकांना सल्ला

प्रतिनिधी नीरज शेळके ठाणे:-

ठाणे, दि. १९ – लघु उद्योग हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा आहे. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा, असा सल्ला एम.एस.एम.ई. मुंबई विभागाचे संचालक पी.  एम. पार्लेवार यांनी दिला.

ठाणे मायक्रो स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि उद्यम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने लघु व मध्यम उद्योग व्यवसायिकांसाठी केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई. योजनेअंतर्गत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन टीप टॉप प्लाझा, ठाणे येथे शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.


या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना एम. एस. एम. ई. चे डायरेक्टर पी. एम. पार्लेवार यांनी वरील सल्ला दिला.कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक जयेश श्रॉफ, डॉ. संजय बोराडे, आर. के. सिंग, भरत सचदेव, एम एस एम ई डेप्युटी डायरेक्टर श्री अभय दप्तरदार, विलास साठे, प्रमुख सल्लागार विजय रमेश त्रिपाठी, ठाणे मायक्रो स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पांचाळ, उद्यम ठाणे चे अध्यक्ष संदीप पाचंगे, चंदू पांचाल ,राकेश पांचाळ, हर्षद जानी ,राजू पांचाळ, रजनीश त्रिपाठी,शीतल कारंडे,नितु शर्मा, रुपेश त्रिपाठी, रितेश पावसकर, विकी चेको  अनिल यादव ,अमित सिंग अक्षय खंडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करत असताना पार्लेकर म्हणाले, इंग्रजांपूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात देशाबाहेर व्यापार होत असे. या व्यवहारात भारताकडून हस्तकला, हातमाग आणि इतर गोष्टींचा व्यापार व्हायचा. त्या बदल्यात भारताला सोने-चांदी मिळत असे आणि म्हणून भारताला `सोने की चिडिया’ असे संबोधले जायचे, असे पार्लेवार म्हणाले.

लघु उद्योगाला भारतात भरपूर वाव आहे. यासाठीच केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई. तर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. अशा मार्गदर्शन मेळाव्यांतून त्या सर्वसामान्यांपुढे माहिती दिली जात असल्याची माहिती पार्लेवार यांनी दिली. नवउद्योजकांना आपला उद्योग उभा करण्यासाठी तसेच नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंग, निर्यात कशी करायची याचे एम.एस.एम.ई.  मार्गदर्शन करते. उद्योग हा व्यवसायातून पैसे कमविण्यासाठी जसा आहे तसा देशाच्या विकासासाठी आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्याच्यात अनेक गुण असायला हवेत.

यासाठीच विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेऊन स्वत:ला विकसित करा असा सल्ला पार्लेवार यांनी दिला.
या कार्यक्रमात एम.एस.एम.ई.च्या अनेक योजनांची माहिती पार्लेवार यांनी दिली. महिलांसाठीच्या योजना आणि अनुदानाविषयी पार्लेवार यांनी सविस्तर माहिती दिली. या सगळ्या योजनांची नोंदणी वेबसाईटवर मोफत असल्याचे त्यांनी सांगितले. लघु आणि मध्यम उद्योगात आपल्याला कोणती माहिती हवी असेल आणि जर कोणती तक्रार असल्यास त्यांनी त्यांच्या मुंबई साकीनाका येथील कार्यालयात संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले. क्रेडिट सुविधा अंतर्गत PMEGP योजना, मुद्रा लोन योजना अशा विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. तसेच जागतिक व्यापार प्रदर्शन, क्लस्टर समूह योजना याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!