पुणे वार्ता :- मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरवार दिनांक:- 18 नोव्हेंबर 2021 रोजी काकड आरती सांगता कार्यक्रमात पंगतीच्या जेवणातून जवळपास ४५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वडगाव- मावळ तालुक्यातील भडवली गावात काकड आरती सांगता कार्यक्रमात पंगतीच्या जेवणातून जवळपास ४५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातून विष बाधा झाली आहे. तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यामध्ये सहा ते सात लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णालयातील तीनही वार्ड पूर्णपणे भरले असून, काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सकाळी अचानक आम्हाला भडवली गावातून फोन आला की, अन्नातून नागरिकांना विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत.
साधारणतः रुग्णालयात २८ ते ३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये ५ ते ६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ग्रामीण रुग्णलाय कान्हे फाटा येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. वर्षा पाटील यांनी दिली.वैद्यकीय अधिक्षक डॉ इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ वर्षा पाटील,डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ पोपट आधाते, डॉ शिवराज वाघमारे रुग्णांचे उपचार करत आहे.
खराब पाण्यामुळे विषबाधा