प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:- जिल्ह्यात कोविड लसीकरणाने वेग घेतला असून जिल्ह्यात येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात सर्व सुट्टीच्या दिवशीसुद्धा लसीकरण करण्यात येत आहे.आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी मंगरूळपीर तालुक्यातील गोलवाडी व मंगळसा लसीकरण केंद्राला भेट दिली.
गोलवाडी येथील प्राथमिक शाळेत असलेल्या लसीकरण केंद्राला डॉ. आहेर यांनी भेट दिली.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.एस.आर.सुर्वे,शाळेचे केंद्र प्रमुख श्री.कुटे, तलाठी एस.डी. खिल्लारे, आरोग्यसेविका श्रीमती वाडेकर,अंगणवाडी सेविका श्रीमती पोफळकर व आशा कार्यकर्ती श्रीमती शिंदे यांची उपस्थिती होती.
गोलवाडीची लोकसंख्या 1628 असून लसीकरणासाठी 1181 व्यक्ती पात्र आहे.आतापर्यंत 893 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. 288 व्यक्तींचे लसीकरण बाकी असल्याची माहिती डॉ.सुर्वे यांनी दिली.गावातील सर्व पात्र व्यक्तींच्या घरोघरी भेट देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण करण्याच्या सूचना डॉ. आहेर यांनी यावेळी दिल्या.
