प्रतिनिधी फुलचंद भगत:-
१०व्या अखिल भारतीय धनुर्विदया
स्पर्धा-२०२१ मध्ये वाशिम जिल्हयाने पटकावली १ सुवर्ण ३ रौप्य पदके
वाशिम:-दिनांक ०९/११ / २०२१ ते १३/११ / २१ या कालावधीत नोयडा उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार
पडलेल्या १०व्या अखिल भारतीय धनुर्विदया स्पर्धा-२०२१ मध्ये येथे आयोजित करण्यात आली होती.
आयटीबीपी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विवीध खेळप्रकारात देशाच्या विविध राज्यातुन पॅरामिल्ट्री
फोर्स,ऑल इंडीया पोलीस फोर्स अशा विविध कार्यक्षेत्रातुन जवजवळ ३१८ खेळाडूंनी आपला सहभाग
नोंदविला होता.

महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघाने सुध्दा आपला सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघात वाशिम जिल्हयाच्या महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री वल्लाळ ब.क्र. ११८८ आणि महिला पोलीस शिपाई रेखा लांडकर ब.नं १३८४ यांचा सहभाग होता. नेत्रदिपक कामगिरी करत कम्पाउंड ५० मिटर धर्नुविद्या या खेळप्रकारात भाग्यश्री बल्लाळ हिने प्रथम क्रमांक मिळुवन सुवर्ण पदक पटकावले तसेच ५० मिटर रॅकिंग फायनल राऊंड मध्ये द्वितीय क्रमांक व ५० मिटर महिला टिम मधुन द्वितीय क्रमांक पटकावुन १ गोल्ड तर २ रौप्य पदक पटकाविले. तर रेखा लांडकर हिने महिला टिम मध्ये द्वितिय कमांक मिळवुन रौप्य पदक पटकावुन महाराष्ट्र पोलीस अर्चरी संघाचे, अमरावती परिक्षेत्राचे तसेच वाशिम पोलीस दलाचे नाव लौकिक केले आहे.महाराष्ट्र पोलीस अर्चरी महिला संघाला रनरअप ट्रॉफी मिळवून दिली.

या दोन्ही खेळाडूंनी याआधी
२०१७-१८ सालच्या मनिपुर ईम्फाळ येथे आयोजित अखिल भारतीय धर्नुविद्या स्पर्धेत ०१ सुवर्ण व ०२
कास्य, २०१८-१९ सालच्या रांची झारखंड येथे झालेल्या अखिल भारतीय धर्नुविद्या स्पर्धेत ०२ सुवर्ण व
०१ कास्य, २०१९ सालच्या पश्चिम बंगाल सिलीगुडी येथे झालेल्या अखिल भारतीय धर्नुविद्या स्पर्धेत ०२
सुवर्ण व ०१ कास्य अशा पदकांची कमाई करून वाशिम जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले आहे.
USA येथे आगामी होणाऱ्या वर्ल्ड पोलीस फायर गेमसाठी तसचे सिनियर ओपन नॅशनल करीता भागश्री
बल्लाळ यांची निवड झाली आहे, तर रेखा लांडकर हिची हैद्राबाद येथे होणाऱ्या ओपन नॅशनल रैंकिग राऊंड
करीता निवड झाली आहे.
