सिंघम रिटर्न:वाशिम जिल्हा परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे बिनविरोध,वाशिम जिल्हा परिषद निवडणुक

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-वाशिम जिल्हापरिषदेवर सिंघम रिटर्न अशी स्थिती झाल्याने पुन्हा एकदा राष्टवादीने झेंडा जिल्हा परिषदेवर रोवला आहे.ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे, रिक्त झालेल्या वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दि.१९ नोव्हेंबर रोजी चंद्रकांत ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने चंद्रकांत ठाकरेंची वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.


अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय घडी बसविण्यात चंद्रकांत ठाकरे यशस्वी ठरले. तथापी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने व काँग्रेस , शिवसेना , महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही साथ मिळाल्याने भाजपनेही माघार घेतली.

वाशीम जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकूण ५२ असून, पोट निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, जनविकास ६, वंचित बहुजन आघाडीचे ६, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल झाले आहे.मात्र जि. प. अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे यांनी,अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली . या निवडणूकीनंतर चार विषय समितीच्या सभापती पदांपैकी रिक्त झालेल्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.दरम्यान , सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे. त्यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!