चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी:- सुनील पाटील
अमरावती वार्ता :- रामगाव मधे आतापर्यंत डेंग्यू या आजाराने हाहाकार घातला असून असून संपूर्ण गाव भयभीत जीवन जगत आहे. रामगावात अंदाजे पाचशेच्या वर लोकसंख्या असून संपूर्ण गावामध्ये ठीक ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या पूर्णपणे तुंबलेल्या दिसून येत आहे.

संपूर्ण पावसाळा गेला परंतु गावातील नाल्याची साफसफाई झाली नाही तसेच आतापर्यंत कोणत्याही प्रकारे सांडपाण्याच्या नालीची साफसफाई केली नाही. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफाईड इत्यादी साथीचे रोग नेहमीच सुरू राहत असतात. साफसफाई बाबत ग्रामसेवक सरपंच यांना बरेच वेळा तोंडी आणि पत्रव्यवहार करून सुद्धा फक्त त्या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. जर याबाबत विचारणा केली तर आम्ही करु तो कायदा असे उत्तर देतात.
रामगाव मध्ये चार सदस्य असून सुद्धा एकाही सदस्याचे मत विचारात घेतले जात नाही. त्यातच भर उपसरपंच यांची आहे. अशा निष्क्रिय ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आपल्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला आहे. यांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जर भविष्यामध्ये काही जीवित हानी झाली तर यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संपूर्ण गावकऱ्यान मधून होत आहे. मागील काही दिवस आधी एकाच वेळी 12 ते 15 डेंग्यूचे रुग्ण सरकारी तसेच खासगी दवाखान्यांमध्ये भरती असुन सुद्धा याबाबत कोणतेही उपाय योजना केली नसून, या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आज पुन्हा परत रामगाव मध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफाईड ईत्यादी रोगांचा उद्रेक पुन्हा पुन्हा पहावयास मिळत आहे.