नवी दिल्ली वार्ता -: आपल्या नेत्याला भेटण्यासाठी कार्यक्रर्ता काहीही करु शकतो, यांचा प्रत्यय नुकताच आला. मध्यप्रदेश जिल्ह्यातील भाजपचा एक सामान्य कार्यक्रर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी तब्बल ७३५ किलोमीटरची पदयात्रा केली.वीस दिवसाच्या पायी यात्रेनंतर त्यांचे मोदींना भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
छोटेलाल अहिरवार असे या कार्यक्रर्त्याचे नाव असून ते मध्यप्रदेश जिल्ह्यातील जैतपूर पिपरिया येथे राहतात. दिल्लीला पोहचल्यानंतर मोदींच्या भेटीसाठी त्यांना दोन दिवस वाट पाहावी लागली. तिसऱ्या दिवशी मोदींना भेटण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. भाजप झेंडाच्या रंगात वेशभूषा केलेले छोटेलाल यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला.
मोदींना भेटण्यासाठी छोटेलाल यांनी २२ सप्टेंबर रोजी आपली पायी यात्रा सुरु केली होती. या पायी यात्रेत त्यांनी रस्त्यात जे मिळेल ते खात आपला प्रवास सुरु ठेवला. ता. १२ आँक्टोबर रोजी ते राजधानी दिल्ली पोहचले. ते दिल्लीत पोहचण्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी छोटेलाल यांची दिल्लीत राहण्याची सोय केली. प्रल्हाद जोशी यांनी मोदींच्या भेटीची वेळ मागितली. त्यामुळे मोदींना भेटण्याचे छोटेलाल यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
ता. १४ आँक्टोबर रोजी त्यांनी मोदींची भेट घेतली. आपल्या गावाबाबत त्यांना मोदींना माहिती दिली. सरकारी योजनाबाबत माहिती दिली. छोटेलाल यांनी मोदींना या भेटीत पत्र दिले आहे. या पत्रात आपल्या गावात एखादा कारखाना सुरु करावा, अशी मागणी छोटेलाल यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. छोटेलाल काल दिल्लीहून आपल्या गावी रेल्वेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.
मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान यांनी पंतप्रधान मोदी व प्रल्हाद जोशी यांचे आभार मानले आहे. मोदी व छोटेलाल यांच्या भेटीचे छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहे. ”मोदींना देशातील सर्व नागरिक प्रिय आहेत. सर्वसामान्य जनतेबाबत मोदींना विशेष प्रेम आहे. छोटेलाल सारख्या सामान्य कार्यक्रर्त्यांला त्यांनी भेट दिली,” अशा भावना शिवराज सिंह चैाहान यांनी व्यक्त केल्या आहेत.