मंगरूळपीर येथे 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम वार्ता :-मंगरुळपीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सकाळी10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी तहसीलदार मा. नरसैय्या कोंडागुरले व श्री धनंजय जगदाळे ठाणेदार , पिएस आय सुषमा परांडे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी विनोद डेरे (पत्रकार ) , फूलचंद भगत (पत्रकार ) , व अशोक राऊत , (पत्रकार ), माजी सैनिक संघटनेचे नंदकिशोर मनवर, मोहन जामनीक, प्रकाश पडघाण, मुकेश बेलखेडे, दिनकर कांबळे, रतन कांबळे, विजय इंगोले, पंडीत भगत, परशराम अंभोरे, हुकुमचंद भगत , किशोर इंगोले ,संजय भगत .समता सैनिक दल वतीने जेष्ठ सैनिक सिताराम ठोंबरे, विष्णू मनवर, तर सैनिक गजानन भगत, संजय अंभोरे , यांनी सलामी देवूनअभिवादन केले .

यावेळी त्रिशरण ,पंचशिल , घेवून सामूहीक वंदना घेण्यात आली . याप्रसंगी तहसिलदार नरसैय्या कोंडागुरले यांचे पुष्पहार घालून स्वागत माजी सैनीक नंदकिशोर मनवर यांनी केले . तर ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे स्वागत पंचशिल बुद्धविहाराचे पंजाबराव अघम , पीएसआय सुषमा परांडे यांचे स्वागत इंदूबाई पाढेन . व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या अध्यक्षा संध्याताई पंडीत यांनी केले. दौलत इंगोले (जी.प सदस्य ) यांचे स्वागत गजानन भगत समता सैनिक दल यांनी केले . जेष्ठ कार्यकर्ते शेषराव मनवर यांचे मिलींद भगत पुष्पहाराने स्वागत केले .

नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक राजू संगत यांचे स्वागत रुपराव इंगोले यांनी केले.फुलचंद भगत (पत्रकार) यांचे स्वागत रमेश शृंगारे यांनी पुष्पमाला अर्पण करून केले तर अशोक राऊत (पत्रकार ) यांचे स्वागत फकीरा शृंगारे यांनी पुष्पहाराने केले. यावेळी बापूराव शृंगारे जे की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व परिसराची स्वच्छता व देखभाल करतात ते बापूराव शृंगारे , अशोक वाघमारे , महादेवराव अंबोरे, प्राचार्य विठलराव खाडे, वसंतराव बडवे , नगरसेवक विनोद पाटील , भास्कर मूळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विनोद डेरे यांनी केलेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!