अखंड हिंदुत्वाचे कवच संबोधणारे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर स्मृतिदिन, अखंड हिंदुत्वासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावून हिंदुत्वा च्या संरक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे ,साहेब १७ नोव्हेंबर २०१२ ला संपूर्ण मराठी माणसाला पोरके करून सोडून गेले, त्याच दिवसाचा साहेबांच्या आठवणींचा श्रण काळजाला रुजतोय १७ नोव्हेंबर ,श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर नांदगाव खंडेश्वर च्या वतीने शहर अध्यक्ष अरुण लहाबर यांच्या निवासस्थानी साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साहेबांच्या प्रतिमेला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शहरातील शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहाली यावेळी साहेबांच्या प्रतिमेला ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने हारार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व शहर अध्यक्ष अरुण लहाबर यांनी भूतकाळातील साहेबांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकून मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्व उपस्थितांनी साहेबांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला श्रद्धांजली च्या कार्यक्रमाला शिवसेना शहर अध्यक्ष अरुण लहाबर, उपजिल्हाप्रमुख महिला रेखाताई नागोलकर, उपशहर प्रमुख निलेश ईखार, उपतालुका प्रमुख उमेश चौकडे ,महिला शहर प्रमुख रेवतीताई परसनकर, गजाननराव नागोलकर, वासुदेवराव लोखंडे ,मनोहर झीमटे ,बाबाराव मारोटकर, पवन डोफे, सुनीलभाऊ गुरुमुडे ,रवी ठाकूर ,प्रशांत काळे, गजानन मारोडकर, सविन नेवारे ,योगेश घोडे, मोहन जंगले ,उत्तमराव लोमटे ,श्रीरामजी लांडगे, प्रल्हादराव मारोटकर, लक्ष्मण झीमटे ,पुंडलिक पुंड ,दिलीप प्रधान ,नामदेव बंड ,दीपक मारोडकर ,सोनू जंगले ,रमेश लहाबर ,यासह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.


