प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे 17 नोव्हेंबर रोजी दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
