Post Views: 721
प्रतिनिधी सिद्धार्थ ग्रावकर
धामणगाव रेल्वे तालुक्यामधील अंजनसिंगी येथील युवा शेतकरी संकेत ज्ञानेश्वरराव वैद्य याने काही दिवसांपूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी श्री. वैद्य यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला, व त्यामध्ये आमदार प्रतापदादा अडसड यांच्या असे लक्षात आले की, श्री. वैद्य यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. म्हणून त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व त्याकरीता प्रामाणिक प्रयत्न केले.
आमदार प्रतापदादा अडसड यांचे आदेश मिळताच भारतीय जनता पार्टी श्री. वैद्य यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली यामध्ये भाजपा जेष्ठ नेते श्री प्रविणभाऊ देशपांडे, श्री गजाननराव पुनसे, भोजराजजी हिवसे, प्रभाकरराव वाघे, संजयराव भोवरकर, पं. स. सदस्य राजकुमारजी केला, शाखा अध्यक्ष सुरेशराव कासमकर, सरचिटणीस ऋषीकेश मुंडेकर, भाजयुमो चे समिर वडे यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या आदेशाचे पालन केले. व वेळोवेळी मदत केली. त्याचबरोबर विरुळ रोंघे येथील भाजपा नेते मंगेशभाऊ गुल्हाने यांनी देखील मोलाचे सहकार्य केले असे श्री. वैद्य यांनी म्हटले आहे.