जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती अंतर्गत तालुका विधी सेवा समिती, चांदूर रेल्वे तर्फे स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
चांदूर रेल्वे तालुक्यातील विविध गावागावांत अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियान अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर स्थानिक पंचायत समितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष के. व्ही. लुंगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील सौ. गहेरवाल, पं.स. सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. उमक, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव देशमुख, उपाध्यक्ष अॅड. अहेफाज राराणी, अॅड. भुयार, अॅड. देशमुख, अॅड. मकेश्वर, अॅड. ओक आदींची उपस्थिती होती. यावेळी न्यायाधिश के. व्ही. लुंगे, अॅड. शिवाजीराव देशमुख व इतरांनी कायदेविषक मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रेणुका मार्डीकर व चांदूर रेल्वे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.