अध्यात्मातुन जीवन जगण्याचा मार्ग मिळतो – सुधाकर पाटील भारसाकळे
दर्यापूर – महेश बुंदे
मानवी जीवन जगत असताना चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी अध्यात्माची आवड असणे महत्त्वाचे आहे, या अध्यात्मातुनच जीवन जगण्याचा मार्ग मिळतो असे प्रतिपादन अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी केले. दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद-सौंदळी परिसरातील श्री पांडुरंग हरी आश्रम येथील श्रीमद भागवत सप्ताह निमित्ताने आयोजित समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर पाटील भारसाकळे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भागवताचार्य गजानन महाराज शास्त्री कार्लेकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष गजानराव जाधव, सरपंच वैशाली निरंजन पानझाडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक सदानंद जाधव, बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव, समाजसेवक रामूशेट मालपाणी, माजी सरपंच रामहरीजी राऊत, संत गाडगेबाबा मिशनचे संचालक गजाननराव देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदी सुधाकर पाटील भारसाकळे यांची नुकतीच नियुक्ती झाली त्याबद्दल त्याचा श्री पांडुरंग हरी आश्रम व स्व.ल पा. जऊळकार सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, समाजसेवक रामुशेठ मालपाणी, पॉवर ऑफ मीडिया तालुका उपाध्यक्ष धनंजय देशमुख यांचा यावेळी पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक सदानंद जाधव यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन डॉ गोपाल जऊळकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग हरी आश्रमाचे संचालक अरूणराव जाधव, उद्धवराव देशमुख, तुकाराम चव्हाण, बळीराम जाधव तसेच अनंता राऊत, दिनेश मेटकर, प्रकाश महल्ले, डॉ गोपाल सवळे, ऋषिकेश मेहरे, दत्ता सवळे, भगवान साठे यांनी परिश्रम घेतले.