Post Views: 416
स्वराज्य वार्ता ब्युरो रिपोर्ट
अमरावती: अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून सोमय्या यांनी अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या हे बुधवारी अमरावतीला जाणार आहेत. मात्र अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
पोलिसांनी विनंती केली असली तरी भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार का याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
रझा अकादमीच्या मोर्चानंतर ज्या दुकानाची तोडफोड झाली, व्यापारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या भेटीसाठी आपण अमरावती दौऱ्यावर येत असल्याचं पत्र सोमय्या यांनी अमरावती पोलिसांना पाठवलं आहे. मात्र जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने हा दौरा रद्द करावा, अशा विनंतीचे पत्र अमरावती पोलिस आयुक्तांनी किरीट सोमय्या यांना पाठवले आहे. मात्र, सोमय्या दौऱ्यावर ठाम आहेत. आपण अमरावती दौऱ्यावर जाणार असून पीडितांची भेट घेणारच असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पोलिस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण होते, मात्र आता परिस्थिति काहीशी नियंत्रणात आली असल्याचे चित्र अमरावती शहरात तसेच जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
संचारबंदी असल्याने सोमय्या यांना अमरावतीला येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.त्यांना तशी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. मात्र नोटीस मिळाल्यानंतर देखील सोमय्या आपल्या दौऱ्यावर ठाम असून, मी अमरावतीला जाणारच असे त्यांनी म्हटले आहे.
सोमय्या यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. ‘आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे’ असे असे सौमैया ट्विटद्वारे म्हणाले. यासोबत त्यांनी पोलिसांची नोटीसही प्रसिद्ध केली.
अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला, याला ठाकरे सरकारची मूक संमती होती, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला, मला अमरावतीकरांची व्यथा व स्थिती समजवून घ्यायची आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी दौऱ्यावर प्रतिबंध असल्याचे असल्याचे पत्र दिल्याचे सोमैया यांनी सांगितले. सोमैयांच्या ट्विटनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.