Post Views: 669
ब्युरो रिपोर्ट स्वराज्य वार्ता
सोलापुर :- कार्तिक एकादशीच्या निमित्ताने काल सोमवारी लाखो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आले होते.या कार्तिकी यात्रेला अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. यात काही चोरट्यांचा समावेश असतो. या चोरट्यांवर कारवाई करण्यासाठी पंढरपूर पोलिसांचे पथक तैनात केले होते. या पथकातील पोलिसांनी या चोरट्यांचा मागोवा घेत मोठी कारवाई केली.काल कार्तिकी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांच्या सामानाची चोरी करताना पोलिसांनी २१ चोरट्यांना भामट्यांना रंगेहाथ पकडण्यात यश आले.
पंढरपुरात काल पोलिसांनी कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागा नदी, संत नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्ग आदी गर्दीच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या वेशात गस्त घालण्याची मोहीम आखली होती. चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तयार करण्यात केलेली होती. त्यामुळे गर्दीत वारकऱ्यांचा खिसा साफ करणाऱ्या ,मोबाईल व महिलांची पर्स लंपास करणाऱ्या व वारकऱ्यांच्या सामानाची चोरी करनाऱ्या १४ पुरुष व ७ महिला चोरांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी या चोरट्याकडून 2 मोबाईल व काही रक्कम हस्तगत केली. अजूनही काही चोरीचे गुन्हे उघडीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांनी वारीत वस्तू, साहित्य, पैसे चोरीला गेले आहेत अशा वारकऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मुगुदुम यांनी केले आहे.