प्रतिनिधी महेश बुंदे:-
आमदार बळवंत वानखडे व दमाणी आय हॉस्पिटल अकोला व रोटरी क्लब बॉम्बे यांचे सौजन्याने भव्य नेत्रदान शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटक आमदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक व तालुका अध्यक्ष दर्यापूर काँगेस, बाळासाहेब हिंगणीकर आरोग्य सभापती अमरावती, सभापती शुक्ला संचालक दमाणी नेत्र रुग्णालय अकोला, गजानन देशमुख ज्येष्ठ पत्रकार, रामूशेठ मालपाणी, डॉ. पठाण, इंजि. नीतेश वानखडे, संजय बेलोकार, अमरावती जिल्हा सचिव काँग्रेस अमोल देशमुख, दत्ता कुंभारकर, निलेश वानखडे, संतोष मिसाळ, रितेश देशमुख, आकाश वाकपांजर, अंकुश डोंगरदिवे, जगदीश कांबे उपस्थित होते. त्याप्रसंगी ३०० रुग्णांची तपासणी तसेच मोतीबिंदू ऑपरेशन करता निवड केली, प्रत्येकाला वेगवेगळ्या तारखेला मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी अकोला येथे दमानी रुग्णालय या ठिकाणी बोलवण्यात आले आहे, हे नेत्र तपासणी शिबिर रुग्णालयाचे डॉ. हर्ष तसेच त्यांचे सहकारी डॉ. केडिया, अजय देशमुख, पवन सावळे, राजू मुदलियार, दत्ता पवार व इतर यांनी परिश्रम घेतले.

