चांदुर रेल्वे बाजार समितीला निवडणुकीचे वेध -20 वर्षांपासून प्रा जगताप यांचे वर्चस्व -अनेक शेतकरी हिताचे निर्णय

चांदुर रेल्वे:-प्रतिनिधी धीरज पवार :-


स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या डिसेंबर २०२१ च्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी प्रसिद्ध होताच राजकीय हाचालींना वेग आला आहे.
बैठका चर्चा सुरू झाल्या आहेत, मागील 20 वर्षांपासून माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांची एकहाती सत्ता स्थानिक बाजार समितीत आहे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय या कार्यकाळात घेण्यात आल्याचे बाजार समितीच्या सभापतींनी सांगितले.

सेवासहकारी सोसायटी मतदरसंघातून११ प्रतिनिधी निवडून द्यायचे असून ३७२ मतदार आहेत. ग्रामपंचायत विभागातून ४ प्रतिनिधीची निवड होऊन त्यासाठी ४०७ मतदार भाग घेणार आहे. व्यापारी/ आडते मतदार संघातून २ प्रतिनिधी असतील त्यासाठी९९ मतदार मतदानात भाग घेतील हमाल/ व्यापारी मतदरसंघातुन १ प्रतिनिधी असून ४७ मतदार भाग घेतील असे १८ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असतील, गेल्या २० वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

मागील पाच वर्षात बाजार समितीला दोन सभापती लाभले प्रभाकरराव वाघ प्रदीपभाऊ वाघ यांच्या कार्यकाळत बाजार समितीच्या आवारात सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले तसेच आवारात सिमेंट काँग्रेटीकरन करणे,शेतकऱ्यानं साठी शेतमाल ठेवण्यासाठी १०००मेट्रिक टन चे नवीन गोदाम बांधणे, याशिवाय शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी १०००मे. टन चे नवीन गोदाम प्रस्तावित असुन केंद्र सरकारकडे शासकीय खरेदीचा १ कोटी रु. निधी येणे बाकी आहे. तो आल्याबरोबर गोदांमाचे व बाजार समितीच्या वॉल कंपाऊंड चे काम सुरू होईल, महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना रोजचे बाजारभाव माहीत व्हावे म्हणून मेसेज ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही सभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंळाच्या निवडणुकीत माजी आमदार वीरेंद्र जगताप निवडून आल्याने मतदार संघावर सहकार क्षेत्रात नेतृत्व सिद्ध केले आहे. नवीनसंच्यालकाच्या निवडणुकित राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असुन, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकिने पुन्हा राजिकिय धुराळा उडणार येवढे मात्र निश्चि

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!