प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-मंगरूळपीर येथील मंगलधाम परिसरात असलेल्या अविनाश विद्यालय जवळील एका नाल्यात दि.१५ नोव्हेंबरच्या दुपाराच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.
प्राप्त माहीतीनुसार,अविनाश शाळा परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे याविषयी पाहणी केली असता लगतच असलेल्या नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यावर असल्याचे निदर्शनात येताच शाळा प्रशासनातील कर्मचार्यांनी याविषयी तात्काळ पोलिसांना माहिती कळवली.घटनेची माहीती मीळताच पोलिस अधिकार्यासह पोलिस विभागाची चमु घटनास्थळी पोहचली.मृतदेह पाण्याबाहेर नाल्यातुन काढला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ऊत्तरीय तपासणीही घटनास्थळावरच करणार असल्याचे समजले.
