मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-दीपावली-दिवाळी हा दिव्यांचा सण. जगभरच्या प्राचीन संस्कृतीमध्ये दिवा हे प्रकाशाचे, सकारात्मकतेचे, आशेचे प्रतीक मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या सणाला जितके अनन्य महत्त्व आहे; तितकेच भारतीय निवडणुकांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला, अन् ओघाने मतदार यादीला. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमसुद्धा. हे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकार, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचे कार्यालयाने यंदा ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली आहे.


मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवला जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कारलियाच्या https://ceo.maharashtra.gov.in/

या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर केली करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलेनाव नोंदवू शकतील असे सांगितले.

महाराष्ट्राच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रात दिवाळी विविध पद्धतींनी साजरी केली जात असली, तरी आकाशदिवा म्हणजेच आकाशकंदील आणि रांगोळी मात्र घरोघरी दिसतात. याच आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आपल्याला यंदाची दिवाळी लोकशाही पद्धतीने साजरी करता येईल. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असते, हे लक्षात घेऊन आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना, नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी आवाहन करता येईल.आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतीकांचा वापर करता येईल.

उदा.डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन इ. वापरता येईल. शिवाय,
मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशीलअचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या करामात. याकरता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करता येईल.बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो.

पण तसे नाही, मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावेत, १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव
नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करता येईल.सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6

या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक, पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही
स्पर्धासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी
८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोमादीमय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!